आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ६ मे, २०२४

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली "महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे" औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई - येथे कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कामगार सोहळ्याला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे यांची तातडीची बैठक असल्याकारणाने कार्यक्रमास उपस्थित राहू शकले शकले नव्हते.मात्र त्यांनी या कार्यक्रमला शुभेच्छा व्यक्त केल्या.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य गुमास्ता माथाडी ट्रान्सपोर्टचे श्री.महेंद्र जाधव यांनी मा.मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी प्रेमाची भेट म्हणून चांदीचा हुक/आरी आणि शाल आणली होती.ती त्यांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांना तमाम माथाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने दिली.यावर बोलताना मा. श्री.किरण पावसकर यांनी सर्व माथाडी कर्मचाऱ्यांना सांगितले तुम्ही दिलेली ही प्रेमाची भेट मी मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना तुमच्या सर्वांच्या वतीने देईन.बाळासाहेब भवन येथे मा.मुख्यमंत्री शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मा. श्री किरण पावसकर यांनी सर्व माथाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने ही प्रेमाची भेट, माथाडी चे प्रतीक म्हणून चांदीचा हुक/आरी आणि शाल मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना देण्यात आले.

घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश जंगम यांच्यातर्फे जय बजरंग व्यायाम शाळेला विभागलातील जनतेच्या वापरासाठी व्हील चेअर व स्ट्रेचेरची भेट

मुंबई (शांताराम गुडेकर ) घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.निलेश नामदेव जंगम यांच्यावतीने,व्हील चेअर व स्ट्रेचेर,जय बजरंग व्यायाम शाळा (भटवाडी, घाटकोपर) या संस्थेला विभागलातील जनतेच्या वापरासाठी भेट म्हणून देण्यात आले.याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी व सभासद,श्री.भावेश चव्हाण,श्री.अजित चव्हाण,संतोष कोंकटी,राजेश चव्हाण,चंदू राणे,बाळू काकडे,संदेश खापरे,उदय चव्हाण,रमेश सुर्वे,सुरेश शिर्के,सागर सुर्वेआणि सुभाष कोकणे आदी उपस्थित होते.यानिमिताने घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.निलेश नामदेव जंगम यांचे स्थानिक जनतेकडून कौतुक होत असून त्यांचे अनेकांनी आभार मानून त्यांना पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर ) रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जातेच त्याच मूळ कारण आपल्या एका रक्तदानाने तिघांना जीवनदान मिळते, कधी कधी जिथं रक्ताची नाती सुद्धा रक्तदानासाठी तयार होत नाहीत तिथं अनेक अनोळखी रक्तदाते रुग्णाला जीवनदान देण्याकरता तत्पर असतात हे म्हणावं लागेल. वर्षभर अनेक ब्लड कॅम्प तसेच नवनवीन रक्तदात्यांना प्रेरित करुन रक्तदान करण्यास प्रवृत्त केले जाते. म्हणूनच जय बजरंग व्यायाम शाळा (भटवाडी, घाटकोपर) व घाटकोपर प्रतिष्ठान,यांच्या संयुक्त विद्यमाने,महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबीरला घाटकोपर मधील युवक -युवती, महिला -पुरुष यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
            कमी वेळेत अनेक रक्तदाते तयार करून अनेकवेळा रक्तदान शिबिरे आयोजित करून मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयातील रक्तपेढीना आणि गरजवंत रुग्णांना रक्ताची उपलबध्दता करून देणे हे कार्य मोठ्या शिताफीने ही संस्था करत असते.अपघात,बाळंतपण,डायलेसिस रुग्ण,सिकलसेल रुग्ण,थेलेसेमीयाच्या रुग्णांना आणि अन्य शस्त्रक्रियांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज लागते.मुंबई सारख्या शहरात दररोज हजारोंच्या संख्येत रक्त युनिटची गरज लागत असते आणि त्या मानाने रक्त संकलन खूप कमी प्रमाणात होत असताना दिसते. कारण अजूनही रक्तदानाच्या गैरसमजुतीमुळे लोक रक्तदान करण्यास टाळत असतात. ते गैरसमज दूर करून अनेकांनी रक्तदानाकडे वळले पाहिजे.रक्तदाते परिवाराला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या हॉस्पिटल,ब्लड बँक यांना मनःपूर्वक धन्यवाद देत त्यांचे आभार व्यक्त केले.रक्ताचा थेंब थेंब आहे मौल्यवान,जो वाचवतो रुग्णांचे प्राण,याची असावी सर्वांना जाण म्हणूनच करावे निःस्वार्थ रक्तदान असा संदेश यानिमित्ताने वृत्त पत्रलेखक सुभाष कोकणे यांच्यातर्फे देण्यात आला.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभारी सचिव कानिक पाटील सेवानिवृत्त

कल्याण (एस. एल. गुडेकर )कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभारी सचिव पदावर कार्यरत असणारे कानिक जयराम पाटील हे मंगळवारी दिनांक ३० एप्रिल रोजी ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते पाटील यांना सेवानिवृत्त निरोप व सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी विविध मान्यवरांच्या हस्ते पाटील यांना गौरविण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
  तसेच कल्याणनजीक असणाऱ्या दावडी गावी कानिक पाटील यांच्या राहत्या घरी सेवानिवृत्ती सत्कार सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या धर्मपत्नी जयश्री पाटील यांनी त्यांना औक्षण केले. तसेच पाटील कुटूंबीय व नातेवाईकांकडून त्याचा यथा योग्य सन्मान करण्यात आला. कानिक पाटील हे कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक जालिंदर पाटील याचे भाऊ आहेत.यावेळी पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती.

जॉय संस्थेला “माणुसकी समाजरत्न” पुरस्कार प्रदान

मुंबई( पूनम पाटगावे)प्रेरणा फाउंडेशन संस्थेच्या वतीने कल्याण येथील अत्रे नाट्यगृहात दिनांक ४ मे २०२४ रोजी मतिमंद मुलांच्या मदतीसाठी एका खास नाटकाचे आयोजन प्रेरणाच्या संस्थापक, लेखिका, समाजसेविका दीप्ती गावकर कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी जमा झालेला निधी या बालकांच्या कल्याणासाठी दिला गेला. यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांना माणुसकी समाजरत्न पुरस्कार देऊन प्रमुख पाहुणे वैभव कुलकर्णी, दिलीप नारकर, रामजित गुप्ता, सुनील इंगळे, गुरुनाथ तिरपणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई महाराष्ट्रात सातत्याने चांगले काम अविरतपणे करीत असलेल्या जॉय ऑफ गिविंग मुंबई या संस्थेचा देखील माणुसकी रत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
    जॉय तर्फे संस्थापक गणेश हिरवे आणि जॉय चे मुंबई अध्यक्ष चंद्रशेखर सावंत यांनी पुरस्कार स्वीकारला.जॉय संस्थेचे काम उल्लेखनीय असून गणेश हिरवे सरांच्या माध्यमातून आणि पुढाकाराने संस्थेचे सभासद आणि दानशूर व्यक्तीच्या मदतीने जॉय अनेकांना सहकार्य करीत असते.कोणताही ऋतू असला तरी जॉय चे काम थांबलेले नाही.गोरगरीब विद्यार्थी, आश्रमशाळा, नैसर्गिक आपत्ती, वृद्धश्रम, आदिवासी पाडे आदी लोकांसाठी जॉय प्रामुख्याने काम करते.पुरस्कार मिळाल्याने अनेक मान्यवरांनी जॉय चे अभिनंदन केले आहे.याआधी देखील जॉय संस्थेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.यावेळी आयोजक प्रेरणा गावकर लिखित दोन अंकी आकांत या नाटकाचा प्रयोग दाखविण्यात आला.

शनिवार, ४ मे, २०२४

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयित्री बहिणाबाई साहित्य परिषद, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय " शिक्षण दर्पण " हा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कल्याण येथील ॲचिवर्स महाविद्यालयाच्या सभागृहात प्रदान करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्री. गजानन ओक, महाराष्ट्र साहित्य परिषदचे अध्यक्ष श्री.विष्णू पाटील, बृ.मनपा माध्यमिक शिक्षण विभागाचे माजी शिक्षणाधिकारी मा.श्री.भानुदास बोराळे, बृ.मनपा शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मा.श्री.आनंदराव सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

रजत महोत्सवी भेट ;१९९९ दहावी बॅच चे विद्यार्थी आले एकत्र

मुंबई (गणेश हिरवे) कुर्ला गांधी बालमंदिर शाळेतील १९९९ रोजी दहावी पास झालेले विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनी एकत्र आले व त्यांनी शाळेतच स्नेहमिलानाचा कार्यक्रम ठेवला होता.यावेळी येथून एस एस सी झालेले अनेक मित्र मैत्रिणी आज वेगवेगळ्या अनेक आस्थापना मध्ये उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत.आज जवळपास २५ वर्षांनी या सर्वांनी एकत्र येत मस्त धमाल केली..नाच गाणी, कविता, शेरो शायरी, जुन्या नवीन आठवणी एकमेकांशी शेअर करीत कार्यक्रमाचा आनंद घेत आजचा भेटीचा दिवस अविस्मरणीय केला.या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी माजी विद्यार्थी सुधीर लाड, वनिता गंगाधर, सुहास खताते, संदीप मालोंडकर, सचिन कुंभार, प्रफुल्ल शार्दुल या मित्रांच्या मदतीने सर्वांनीच कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.शेवटी विद्यार्थ्यां तर्फे उपस्थित आजी माजी शिक्षकांना आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देण्यात आले. पुढाकार घेतला होता.यापुढेही आपण एकमेकांना असेच भेटत राहू या विश्वासाने राष्ट्रगीत बोलून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...